ज्यांच्याकडे जास्त संख्या त्यांचाच पक्ष खरा- रावसाहेब दानवे

ज्यांच्याकडे जास्त संख्या त्यांचाच पक्ष खरा- रावसाहेब दानवे

| Updated on: Jul 22, 2022 | 4:13 PM

शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची होती की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना फोडायची होती हे मात्र माहित नाही. दोघं नेते एकत्र बसून कोणाला संपवणार होते हे काय माहित नाही, असंही ते म्हणाले.

“2019 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा सर्वांचं हेच म्हणणं होतं की गेले 25 वर्षे आपण ज्यांच्यासोबत होतो, त्यांच्यासोबत युती करावी. मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचा अनादर करून सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी महाविकास आघाडी केली. आता मात्र ही खरी सेना आहे. ज्यांच्यामागे जास्त लोक, तोच पक्ष खरा”, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. आता शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची होती की राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना फोडायची होती हे मात्र माहित नाही. दोघं नेते एकत्र बसून कोणाला संपवणार होते हे काय माहित नाही, असंही ते म्हणाले.

Published on: Jul 22, 2022 04:13 PM