अभिनेता Salman Khan आणि Salim Khan यांना धमकीचं पत्र
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना धमकीच पत्र आलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञातविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना धमकीच पत्र आलं आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ज्ञातविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. सलीम खान मॉर्निंग वॉक करुन जिथे थांबतात, तिथे हे धमकीचं पत्र मिळाल आहे. सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला हे पत्र आढळलय. पंजाबमधील गायकाच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. याआधी सुद्धा सलमान खानला अनेकदा धमकी मिळाली आहे. पण पंजाबमधील हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सलामन खानला मिळालेली धमकी गंभीर मानली जात आहे.
Published on: Jun 05, 2022 07:41 PM
Latest Videos