केदारनाथ मंदिर धोक्यात? दर 5 मिनिटांनी उडणाऱ्या हेलिकॉप्टरचा मंदिराला धोका, तज्ज्ञांचा इशारा काय?

केदारनाथ मंदिर धोक्यात? दर 5 मिनिटांनी उडणाऱ्या हेलिकॉप्टरचा मंदिराला धोका, तज्ज्ञांचा इशारा काय?

| Updated on: May 22, 2023 | 8:47 AM

VIDEO | केदारनाथ मंदिराला नवा धोका, 9 हेलिपॅडवरून दर 5 मिनिटांनी एक हेलिकॉप्टर येत असल्यानं तज्ज्ञांनी काय व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : केदारनाथ यात्रा 25 एप्रिल ते 14 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणार आहे. या 7 महिन्यांत भाविकांच्या संख्येचे सर्व विक्रम मोडीत निघणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच केदारनाथ मंदिराबाबत एक मोठी चिंतेची बाब समोर आली आहे. यंदा केदारनाथ मंदीर यात्रेसाठी करण्यात आलेल्या 2023 मध्ये दर 5 मिनिटांनी केदारनाथ मंदिर परिसरात हेलिकॉप्टर उडणार असल्याचे सांगितले जात आहे. चिंतेची बाब म्हणजे या दर पाच मिनिटाला उडणाऱ्या एका हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे कंपने निर्माण होत असल्याने मंदिराला याचा मोठा धोका असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे आणि हेच मोठं संकट या मंदिरासाठी असणार आहे. कारण केदारनाथ धामचं हे मंदिर मोठाले हिमनग, डोंगर कापून बांधण्यात आल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच हेलिकॉप्टरच्या मोठ्या आवाजामुळे आणि कार्बनच्या धुरामुळे मंदीर आणि संपूर्ण परिसर धोक्यात आला आहे. इतकेच नाही तर हेलिकॉप्टरमुळे हिमकडेही कोसळू शकतात. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण इतके सोपे आणि अवैज्ञानिक मार्ग केले आहेत की देवावरच संकट आल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Published on: May 22, 2023 08:47 AM