बार्शीचे आमदार Rajendra Raut यांना धमकी- Devendra Fadnavis यांचा गंभीर आरोप

| Updated on: Mar 24, 2022 | 7:40 PM

लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसायाविरोधात मुद्दा मांडत असतील आणि तोही पुराव्यानिशी देत असतील तर त्याचा तपास होणं गरजेचे आहे. मात्र अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून  त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या.

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राज्यातील समस्यांवर मुद्दे उपस्थित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या छोट्या भाषणासह महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र म्हणत मविआवर जोरदार हल्लाबोल केला. बार्शीतील पोलीस निरीक्षक शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांचा वाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशानात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदारपणे उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी अवैध व्यवसायाविरोधात मुद्दा मांडत असतील आणि तोही पुराव्यानिशी देत असतील तर त्याचा तपास होणं गरजेचे आहे. मात्र अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून  त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या. तर अशा गोष्टी होत असतील तर तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेण असे म्हणत त्यांनी जोरदार आणि गंभीर आरोप केले.