आमदाराला शिवीगाळ अन् धमकीचा कॉल, काय आहे धमकीचं कारण? कुणाला आला फोन
VIDEO | राज्यात राजकीय नेत्यांना धमकी देण्याचं सत्र सुरूच, आमदाराला शिवगाळ करत दिली धमकी; कुठं घडला प्रकार?
नाशिक : राज्यात राजकीय क्षेत्रातील मंडळींना धमकी देण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. त्यानंतर अनेक नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र आता नाशिकमध्ये शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकी देण्यात आली आहे. हिरामण खोसकर हे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या राज्यातील बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असताना ही धमकी देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आता प्रचार सुरू झाला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. त्याच दरम्यान विरोधात प्रचार करत आहे म्हणून आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणात शिवाजी चुंबळे, अजिंक्य चुंबळे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.