Mumbai Threatening Call | मुंबई, दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवणार, कुणी केला धमकीचा फोन?
VIDEO | मुंबई आणि दिल्ली विमानतळावर धमकीचा फोन, अज्ञाताविरोधांत मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल... बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा कुणी केला धमकीचा फोन?
मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ | मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई, दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा धमकीचा फोन आलाय. हा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला असल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीच्या फोननंतर अज्ञाताविरोधांत मुंबई पोलिसांकडून सहार पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, दिल्ली या ठिकाणावर दोन्ही विमानतळावर या धमकीच्या फोन नंतर तपास सुरू केला असता काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नसल्याचे सांगितले जात आहे. तर मुंबई पोलिसांकडून कलम ५०६ (२) ५०५ (१) या कलमांतर्गत या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Aug 05, 2023 01:13 PM
Latest Videos