Afghanistan | अफगाणिस्तानच्या 50 जणांचा जीव घेणाऱ्या मशिदीतला बाँब ब्लास्ट Live
याआधी शुक्रवारी उत्तर अफगाणिस्तानातील शिया मशिदीत झालेल्या स्फोटात 100 हून अधिक जण ठार झाले होते. शेकडो लोक नमाज पठण करत असताना हा स्फोट झाला.
अफगाणिस्तानच्या कंदहारच्या इमाम बर्गह मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त 15 ऑक्टोबर रोजी समोर आले. या स्फोटात अनेकजण मृत्यूमुखी पडले तर बरेचजण जखमीही झाले होते. ही शिया मशीद असून, ज्यात नागकरिक शुक्रवारी नमाज पठणासाठी जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मशिदीमध्ये एकामागून एक तीन स्फोट झाले. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते सईद कोस्ती म्हणाले की, या स्फोटात डझनभर लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती आहे. तालिबानचे विशेष दल घटनास्थळी पोहोचले असून कोणत्या प्रकारचा स्फोट होता याची चौकशी करत आहेत. दरम्यान या सर्व स्फोटाचा एक लाईव्ह व्हिडीओ मशिदीतील CCTV कॅमेऱ्यातून समोर आला आहे.
Latest Videos