Video | पुराच्या पाण्यात गेल्या 3 म्हशी वाहून, विरारमधील धक्कादायक घटना
विरारमध्ये पुराच्या पाण्यात 3 म्हशी गेल्या वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत.
विरार : विरारमध्ये पुराच्या पाण्यात 3 म्हशी गेल्या वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत. आज दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती होताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 म्हशीला वाचविले आहे. तर तिसऱ्या म्हशीचा शोध सुरू आहे. वसई विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिसरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे
Published on: Jun 17, 2021 05:49 PM
Latest Videos