साईभक्तांसाठी आनंदाची बातमी ! शिर्डीत रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी ! शिर्डीत रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

| Updated on: Mar 28, 2023 | 5:28 PM

VIDEO | शिर्डीतील साईबाबा मंदिरात रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; साईबाबांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी

शिर्डी : साईभक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. येत्या ३० मार्च रोजी शिर्डीतील साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहाणार आहे. उद्यापासून शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सुरुवात होत आहे. ३० मार्च रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. त्यामुळे ३० मार्च रोजी नित्‍याची शेजारती तसेच ३१ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नसल्याचे देखील साईसंस्थानकडून सांगण्यात आलं आहे. या तीन दिवसीय रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो पालख्यांसह दरवर्षी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल होत असतात. उत्सवादरम्यान विविध धार्मिक तसेच‌ सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतात. त्यामुळे यंदाच्या रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Published on: Mar 28, 2023 05:28 PM