BIG BREAKING : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी

BIG BREAKING : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी

| Updated on: May 22, 2024 | 5:14 PM

पुणे अपघात प्रकरणातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर याला तीन दिवस कोठडीत राहवं लागणार आहे.

पुणे हिट अँड रन अर्थात पुणे अपघात प्रकरणातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर याला तीन दिवस कोठडीत राहवं लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. परंतु सत्र न्ययालयाकडून नामंजूर करत तीन दिवसांची कोठडी तिनही आरोपींना सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालायत सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Published on: May 22, 2024 05:14 PM