भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवणारी बातमी, डझनभरांचा होणार पत्ता कट?
भाजप नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहे. तर करण्यात आलेल्या या अंतर्गत सर्व्हेनुसार डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचा पत्ता कट होणार?
मुंबई, ८ मार्च २०२४ : महाराष्ट्रातील भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहे. तर करण्यात आलेल्या या अंतर्गत सर्व्हेनुसार डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचा पत्ता कट होणार का? अशी चर्चाही भाजपच्या गोटात सुरू आहे. सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करण्यासह काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी देखील या सर्व्हेतून समोर आली आहे. दरम्यान, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. यासह ३ पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकीटाबाबत आक्षेप देखील घेण्यात येत असताना कोणत्या जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यता आहे बघा….