अजित पवार भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीच्या ‘या’ ३ आमदारांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले…
VIDEO | अजित पवार भाजपच्या वाटेवर असताना राष्ट्रवादीतून एक मोठी बातमी आली समोर, अजित दादांना कुणी दर्शवला खुला पाठिंबा?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतेय ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार… मात्र यावर अजित पवार यांनी ट्विट करून थेट स्पष्टीकरणच दिले आहे. यानंतर राष्ट्रवादीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी अजित पवार यांना जाहीरपणे आपला पाठिंबा दर्शवला आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, सिन्नरचे आमदार मानिकराव कोकाटे आणि नाशिकच्या सुरगाणा येथील आमदार नितीन पाटील या तिघांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. जिथं अजित पवार तिथं आम्ही, असे नितीन पाटील यांनी म्हटले आहे तर अजित पवार भाजपसोबत गेल्यास आपणही जाणार आणि अजित दादा जो निर्णय घेतीलतो आम्हाला मान्य असेल असे इतर दोघांनीही म्हटले आहे. या नेत्यांच्या पाठिंब्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Published on: Apr 18, 2023 10:09 AM
Latest Videos