चुनाभट्टीतील गोरखनाथ मंडळ परिसरात कोसळली दरड, तीन जण जखमी
मुंबईतील चुनाभट्टीत दरड कोसळून तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. चुनाभट्टीतील गोरखनाथ मंडळ परिसरात ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मुंबईतील चुनाभट्टीत दरड कोसळून तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. चुनाभट्टीतील गोरखनाथ मंडळ परिसरात ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम आहे. मुंबई आणि ठाण्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. ठाणे जिल्ह्यात 9 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Published on: Jul 06, 2022 01:52 PM
Latest Videos