लोकसभेसाठी महायुतीच्या 3 राऊंड बैठका अन् 2 फॉर्म्युल्यावर चर्चा, शिंदे अन् दादांना किती जागा?
अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या तिनही नेत्याची बैठक झाली आहे. त्या बैठकीतून दोन फॉर्म्युले समोर आले आहेत. महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत खलबलं झालीत. ४८ जागांच्या वाटपावर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत तीन राऊंडची बैठक झाली
मुंबई, ७ मार्च २०२४ : भाजपची दुसरी यादी येण्याची शक्यता असून यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं असण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या तिनही नेत्याची बैठक झाली आहे. त्या बैठकीतून दोन फॉर्म्युले समोर आले आहेत. महायुतीच्या जागा वाटपावर मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत खलबलं झालीत. ४८ जागांच्या वाटपावर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत तीन राऊंडची बैठक झाली आणि आता अंतिम शिक्कामोर्तब भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत होणार आहे. त्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत पोहोचले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या दोन फॉर्म्युला पैकी पहिला फॉर्म्युल्यात भाजप ३७, शिवसेना ०८, अजित पवार ०३ जागा मिळणार आहे. तर दुसऱ्यामध्ये भाजप ३६, शिवसेना ०८, अजित पवार ०४ जागा मिळणार आहे. म्हणजेच जागा वाटपामध्ये दबदबा हा भाजपचा राहणार आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट….