राजकारण लई बेक्कार... पती लोकसभा लढणार, पण बायको दुरावणार?

राजकारण लई बेक्कार… पती लोकसभा लढणार, पण बायको दुरावणार?

| Updated on: Apr 03, 2024 | 10:57 AM

पक्षीय राजकारणापायी मध्यप्रदेशात ३३ वर्षांपासून एकत्र नांदणाऱ्या नवरा-बायकोला विभक्त होण्याची वेळ आली आहे. हे आहे मुंजारे दाम्पत्य. पती बसपाचे लोकसभा उमेदवार आहे तर पत्नी पूर्वीपासून काँग्रेसचे आमदार... नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात...

निवडणूक काळात अनेक अजब गोष्टी समोर येतात. वेगवेगळे उमेदवार, कार्यकर्ते त्यांच्या प्रचाराचे फंडे चर्चेत राहतात. पक्षीय राजकारणापायी मध्यप्रदेशात ३३ वर्षांपासून एकत्र नांदणाऱ्या नवरा-बायकोला विभक्त होण्याची वेळ आली आहे. हे आहे मुंजारे दाम्पत्य. पती बसपाचे लोकसभा उमेदवार आहे तर पत्नी पूर्वीपासून काँग्रेसचे आमदार… नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात असल्याने आता समर्थकांनाच प्रचारावर साशंकता निर्माण झालीये. त्यामुळे पतीने निवडणूक होईपर्यंत आपल्या पत्नीला थेट मेव्हणीकडे राहण्याचा सल्ला दिलाय. महाराष्ट्रात बड्या राजकीय घराण्यात दोन सोडून चार-चार पक्ष आहेत पण त्यांच्या संसारात कधी बाधा निर्माण झालेली नाही. मात्र मध्यप्रदेशात ३३ वर्षांच्या संसारात निवडणुकीनं मिठाचा खडा टाकलाय. आणखी कोण-कोणते अजब गजब प्रकार निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेत बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 03, 2024 10:54 AM