बैस आहेत की ‘बायस’ हे येणार काळ ठरवेल, संजय राऊत यांची रोखठोक प्रतिक्रिया
राज्यपाल यांचा कार्यकाल पूर्ण करून दिला. अन्य बदल्या केल्या त्यासोबतच त्यांची बदली केली. म्हणजे केंद्र सरकारने काही महाराष्ट्रावर फार उपकार केलं असे नाही. भाजपने त्यांना शेवटपर्यत पाठीशी घातले याची नोंद राहील.
मुंबई : राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्यावरून प्रतिक्रिया ही महाराष्ट्राची यायला हवी. कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच लोक रस्त्यावर उतरले होते. राजभवनातले ‘एजन्ट’ म्हणून त्यांनी काम पाहिले. घटनाबाह्य काम केले. आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. १२ सदस्यांच्या यादी मंजूर केली नाही. राज्यपाल गृहमंत्रालयाच्या दबाबावाखाली होते. त्यांनी जी वक्तव्य केली त्यानंतर त्यांना हटवणे गरजेचे होते. पण, राज्यपाल यांचा कार्यकाल पूर्ण करून दिला. अन्य बदल्या केल्या त्यासोबतच त्यांची बदली केली. म्हणजे केंद्र सरकारने काही महाराष्ट्रावर फार उपकार केलं असे नाही. भाजपने त्यांना शेवटपर्यत पाठीशी घातले याची नोंद राहील. आता नवीन राज्यपाल येत आहेत. ते बैस आहेत की ‘बायस’ आहे ते माहित नाही. त्यांनी घटनेनुसार काम करावे ही अपेक्षा आहे. घटनेनुसार काम केले तर त्याचे स्वागत आहे. राजभवनाला त्यांनी भाजपचे मुख्यालय बनवू नये. विरोधी पक्षाचा आवाज घटनेनुसार राखायला हवे. घटनाबाह्य सरकारचे निर्णय त्याच्या शिफारशी किती आणि कशा मेनी करायच्या त्याचे भान ठेवावे लागेल, नाही तर पुन्हा एकदा संघर्ष होईल असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.