तुम्ही कधी पाहिलंय का इतक्या जवळून वाघिणीला? टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सुट्टी वसूल
टिपेश्वर अभयारण्यात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी यंदा देखील गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सकाळी माथनी गेट वरून सफारी करताना टिपाई मंदिर परिसर पाणवठ्यावर तलाववाली वाघिणीने पर्यटकांना आपले दर्शन दिले. या अभयारण्यात हमखास व्याघ्र दर्शन होतेच
यवतमाळमधील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्याला नेहमीच पक्षी, वन्यजीवप्रेमींसह पर्यटक भेट देत असतात. याच टिपेश्वर अभयारण्यात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी यंदा देखील गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सकाळी माथनी गेट वरून सफारी करताना टिपाई मंदिर परिसर पाणवठ्यावर तलाववाली वाघिणीने पर्यटकांना आपले दर्शन दिले. या अभयारण्यात हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने तेलंगणा, विदर्भ, यासह इतर राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने टिपेश्वर अभयारण्यात दाखल होत आहे. आज पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना कधीकाळी दिसणाऱ्या तलाववाली या वाघिणीने पाणवठ्यावर मनसोक्त दर्शन दिले. हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केले. तुम्ही कधी पाहिलंय का इतक्या जवळून वाघ किंवा वाघिणीला….?
Published on: May 31, 2024 05:45 PM
Latest Videos