Tirupati Balaji Temple : तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
'आंध्रप्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू, जनसेना आणि भाजप मिळून सरकार आलंय.. त्यानंतर चंद्रबाबू नायडूंनी गेल्या पाच वर्षात तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये जी गडबड झाली त्याचं निरीक्षण केलं. हिंदू सनातन धर्माच्या अस्थेचा केंद्रबिंदू आहे, तर त्या ठिकाणी ख्रिश्चनांचं काय काम?.. ', असा सवालही स्वामी कमलेश महाराज यांनी केला.
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराची ओळख. या मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूत बीफ म्हणजे चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली. तर तिरूपती मंदिरातील लाडूमध्ये चरबी मिळाल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून करण्यात आली आहे. यानंतर आता तिरूपती मंदिरात हिंदूंना डावलून तर ख्रिश्चन धर्माचे चेअरमन ठेवल्याचा आरोप तिरूमला तिरूपती देवस्थानचे स्वामी कमलेश महाराज यांनी केला आहे. तर कायद्यात बसत नसताही करूणाकर रेड्डींना तिथे नियुक्त करण्यात आलं, असा गंभीर आरोपही स्वामी कमलेश महाराज यांनी केला आहे. तर चेअरमनपदी करूणाकर रेड्डी यांना नियुक्त केल्यानतंर आंदोलनही करण्यात आल्याचा दावा स्वामी कमलेश महाराज यांनी केला आहे. यासह करूणाकर रेड्डी यांनी हिंदू कामगारांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तीत केल्याचंही स्वामी कमलेश महाराज यांनी म्हटलं आहे.