Maharashtra Corona Cases | आज राज्यात 2 हजार 172 रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. कालही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले होते.
कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे आहेत, कारण राज्यात दिवसभरात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. कालही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले होते, देशासह राज्यात पुन्हा मोठी रुग्णवाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. प्रशासन पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देशासह, राज्याच्या डोक्यावरही कायम आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा अशी स्फोटक आकडेवारी समोर येऊ लागल्याने पुन्हा धाबे दणाणले आहेत.
Latest Videos