मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी
आज मुंबईसह उपनगरात पाऊस पडला, पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माणा झाला. वातावरण थंड झाल्याने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान जरी पाऊस झाला असला तरी देखील ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.