आजची सभा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असेल - संजय राऊत

आजची सभा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असेल – संजय राऊत

| Updated on: May 14, 2022 | 3:18 PM

राजकीय सभा असो की पक्षाची भूमिका, शिवसेनेसाठी नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले संजय राऊत यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी आजची सभा ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असेल, असं सांगितलं. राज्यातलं वातावरण विरोधकांनी गढूळ केलं आहे. भ्रष्ट केलं आहे. विरोधकांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे.

मुंबईः मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवर शिवसेना (Shivsena) प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विराट सभा पार पडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उचलून धरलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) भाजपनं दिलेलं आव्हान यामुळे महराष्ट्रातील वातावरण संवेदनशील झालंय. आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात, विरोधकांची कोणत्या शब्दात कानउघडणी केली जाईल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राजकीय सभा असो की पक्षाची भूमिका, शिवसेनेसाठी नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले संजय राऊत यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी आजची सभा ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असेल, असं सांगितलं. राज्यातलं वातावरण विरोधकांनी गढूळ केलं आहे. भ्रष्ट केलं आहे. विरोधकांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या एकात्मते्चया पायावर हल्ले करण्याचा प्रयत्न आहे. या सर्व प्रश्नांवर उद्धवजी परखडपणे बोलतील अशी अपेक्षा आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Published on: May 14, 2022 03:18 PM