Nana Patole | उद्या कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दुपारी 12 ते 1 राजभवनासमोर मूक आंदोलन करणार : नाना पटोले

| Updated on: Oct 10, 2021 | 7:49 PM

काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे.