TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 13 November 2021
देशात उडालेला महागाईचा भडका, गगणाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती यासह अन्य दरवाढीच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने महागाईविरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
देशात उडालेला महागाईचा भडका, गगणाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती यासह अन्य दरवाढीच्या विरोधात शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने महागाईविरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात क्रांतीचौक येथून होणार असून, शहरातील गुलमंडी परिसरात मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चानंतर संजय राऊत हे सभा देखील घेणार आहेत. या मोर्चाला शिवसेना मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांची उपस्थिती असणार आहे.
त्यापूर्वी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, केवळ इंधन दरवाढीवर अवलंबून वस्तूंच्याच दरात वाढ झाली नाही तर मोबाइल फोनचे रिचार्ज, एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेतही अधिक पैशांची कपात होत आहे. पेट्रोल महाग, डिझेल महाग, गॅस महाग, अत्यावश्यक वस्तुंचे दर देखील गगणाला भिडले अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचाच निषेध करण्यासाठी 13 नोव्हेंबरला शिवसेना संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.