TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 18 September 2021

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 18 September 2021

| Updated on: Sep 18, 2021 | 10:38 AM

महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाईत शुक्रवारी रात्री जोगेश्वरी येथून एकाला ताब्यात घेण्यात आलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्यांसोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतकंच नाही तर संशयित व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित असून, तो जान मोहम्मद याचा हँडलर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएस आणि क्राईम ब्रांचकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. जाकीर हा जान मोहमद याच्या संपर्कात होता. जाकीरने जान मोहमदला मुंबईत हत्यार आणण्यासाठी सांगितलं, असा पोलिसांना संशय आहे.