VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 1 May 2022
राज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण हे बोलताना राज्याच्या अस्मितेसाठी बोलायला हवं, बदनामीसाठी नव्हे. द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका, असा सल्ला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. हनुमान चालीसा पठण करायचा असेल तर, मंदिरात जाऊन करा. म्हणजे देवही पावेल आणि संकटही टळेल.
राज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण हे बोलताना राज्याच्या अस्मितेसाठी बोलायला हवं, बदनामीसाठी नव्हे. द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका, असा सल्ला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. हनुमान चालीसा पठण करायचा असेल तर, मंदिरात जाऊन करा. म्हणजे देवही पावेल आणि संकटही टळेल. मात्र कुणाच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणाल तर संकट आल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याच्या लगावला आहे. राज यांनी आजच्या सभेतून राज्याला पुढे नेण्याचा, जातीय सलोखा टिकवण्याचा विचार द्यायला हवा. राज्य सरकारला काही सूचना करायच्या असतील तर अवश्य कराव्या. मात्र जातीय तेढ, द्वेष वाढवू नका असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केलं आहे.
Latest Videos