VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 11 May 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 11 May 2022

| Updated on: May 11, 2022 | 12:21 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. शेअर मार्केटमध्ये 5600 कोटीचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी मोतीलाल ओसवाल ही कंपनी ईडीच्या फेऱ्यात आली होती. या कंपनीची चौकशी व्हावी म्हणून सोमय्यांनी आकांडतांडव केलं होतं. या कंपनीच्या कार्यालयातही सोमय्या गेले होते. तसेच कंपनीच्या शिपायांच्या घरीही सोमय्या गेले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. शेअर मार्केटमध्ये 5600 कोटीचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी मोतीलाल ओसवाल ही कंपनी ईडीच्या फेऱ्यात आली होती. या कंपनीची चौकशी व्हावी म्हणून सोमय्यांनी आकांडतांडव केलं होतं. या कंपनीच्या कार्यालयातही सोमय्या गेले होते. तसेच कंपनीच्या शिपायांच्या घरीही सोमय्या गेले होते. त्यानंतर या कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंची देणगी कशी मिळाली? असा सवाल करतानाच ईडीने या कंपनीची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. हा ईडीच्या अख्त्यारीत प्रश्न आहे. त्यामुळे ईडीने चौकशी केली पाहिजे. आम्ही ईडीला याबाबतची सर्व माहिती देऊ, असं सांगतानाच सोमय्याची युवक प्रतिष्ठान ही काळा पैसा पांढरा करणारी संस्था आहे, असा आरोपही त्यांनी केला. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.