VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 12 January 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 12 January 2022

| Updated on: Jan 12, 2022 | 12:49 PM

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असे राऊत म्हणाले.

गोव्यात भाजपला गळती लागली असून अनेक आमदार, नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. असे असले तरी दुसरीकडे गोवा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेवर भाजपकडून टीका केली जातेय. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत असते. अनामत रक्कम जप्त न होण्यासाठी त्यांची लढाई असते, अशी खोचक टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राऊत यांनी समर्पक उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असे राऊत म्हणाले.