VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 12 October 2021
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा नाशिक रोडवरील मोशी -चांडोली टोल नाका आयआरबी कंपनीने आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकराना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोडवरील मोशी-चांडोली टोल नाक्याचे रस्ता बांधणीचे पुर्ण पैसे वसूल झाल्याने आयआरबीने टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला.
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा नाशिक रोडवरील मोशी -चांडोली टोल नाका आयआरबी कंपनीने आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकराना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोडवरील मोशी-चांडोली टोल नाक्याचे रस्ता बांधणीचे पुर्ण पैसे वसूल झाल्याने आयआरबीने टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला. 8 ऑक्टोबर 2021 रोजी मोशी-चांडोली टोलनाक्याची मुदत पूर्ण झाली आहे. हा टोलनाका बंद झाल्याने मोशी -चांडोली नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी थोडी फार कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
Latest Videos