VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज |13 September 2021

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज |13 September 2021

| Updated on: Sep 13, 2021 | 12:46 PM

 गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणं काठोकाठ भरल्याने आता पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणं काठोकाठ भरल्याने आता पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सध्याच्या घडीला 99.94 टक्के पाणीसाठा आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.