VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 17 August 2021
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला. याचं समर्थन करताना देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली. संदीप देशपांडे म्हणाले, “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले 20 वर्षे बघत आहे.
Latest Videos