VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 20 June 2021
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी जमलेली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कोरोनाची नियमावली पायदळी तुडवली गेली.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी जमलेली होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात कोरोनाची नियमावली पायदळी तुडवली गेली. आता यासर्व प्रकरणानंतर पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या गर्दीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मिश्किल टीका केली होती. “कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा झाली असावी की जर तुम्ही गर्दी केली तरी मी तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुम्ही जर मुंबईत सर्वसामान्यांसाठी अधिवेशन भरवाल तर मी त्रास देईल. अनेक मंत्री मोर्चात सहभागी झाले. त्यावर काय कारवाई झाली? यावर हेच जमावबंदीचे आदेश लावतात. लग्नात 25 जणांपेक्षा जास्त जण असलेले तर वधू-वरावर गुन्हा दाखल करतात. असाप्रकारची टिका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.