VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 21 July 2021

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 21 July 2021

| Updated on: Jul 21, 2021 | 11:58 AM

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेने राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेने राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.