VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 23 May 2022
आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. आम्ही दोन जागा लढवणार. दुसरा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने आज अत्यंत कडक भूमिका घेत संभाजीराजेंना पाठिंबा देणारच नसल्याचं स्पष्ट केलं. संभाजीराजेंनी एकतर शिवसेनेत यावं आणि राज्यसभेवर जावं. आम्हाला आमचा राज्यसभेत एक खासदार वाढवायचा आहे.
आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. आम्ही दोन जागा लढवणार. दुसरा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने आज अत्यंत कडक भूमिका घेत संभाजीराजेंना पाठिंबा देणारच नसल्याचं स्पष्ट केलं. संभाजीराजेंनी एकतर शिवसेनेत यावं आणि राज्यसभेवर जावं. आम्हाला आमचा राज्यसभेत एक खासदार वाढवायचा आहे. आमची मतं आहेत. ती अपक्षांना आम्ही कशी देणार? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल न झाल्याने संभाजी राजे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे या संदर्भात येत्या एक दोन दिवसात आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.