VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 28 July 2022
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, ‘मी अर्जुन खोतकरांचं निवेदन ऐकलं. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. ते फार जुने सहकारी आहेत. त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावर आणि कुटुंबावर कोणत्या प्रकारचा तणाव आहे
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, ‘मी अर्जुन खोतकरांचं निवेदन ऐकलं. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. ते फार जुने सहकारी आहेत. त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावर आणि कुटुंबावर कोणत्या प्रकारचा तणाव आहे. कोणत्या यंत्रणेचा आहे. त्यामुळे अशा संकटाच्या काळात कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. हे त्यांनी प्रामाणिक सांगितलं. त्याने हिंदुत्वाला बदनाम केलं नाही. आम्ही हिंदुत्वामुळे सोडतोय. उद्धव ठाकरे यांच्यावर काही आक्षेप असल्यामुळे शिवसेना सोडतोय. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप घेतोय ,अशी भूमिका न घेता अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर दबाव असल्याचं स्पष्ट केले, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Published on: Jul 28, 2022 12:09 PM
Latest Videos