VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 29 July 2021
पेगासस प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससवर चर्चा व्हावी. या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे.
पेगासस प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससवर चर्चा व्हावी. या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. पण सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघाती हल्ला संजय यांनी चढवला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना पेगासस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे तुम्हाला सरकार सतेत आल्यापासून जाणवत असेल.
Latest Videos