VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 February 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 February 2022

| Updated on: Feb 03, 2022 | 12:23 PM

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा, केंद्रीय अर्थसंकल्पातील शिक्षणाविषयीची तरतूद आणि पहिली दुसरीचा अभ्यासक्रम यावर भाष्य केलं. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा, केंद्रीय अर्थसंकल्पातील शिक्षणाविषयीची तरतूद आणि पहिली दुसरीचा अभ्यासक्रम यावर भाष्य केलं. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपण अभ्यासावर लक्ष केंद्रीत कराव, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.