VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 5 November 2021

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 5 November 2021

| Updated on: Nov 05, 2021 | 1:33 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत अंमलबजावणी संचालनालयानं (इडीनं) अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसतेय. आता ईडीकडून अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठविण्यात आलं. ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत अंमलबजावणी संचालनालयानं (इडीनं) अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसतेय. आता ईडीकडून अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठविण्यात आलं. ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शुकशुकाट पसरलाय. काल अनिल देशमुख यांची मेडिकल चाचणी झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते बाहेर आल्याची माहिती त्यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी माध्यमांना दिली. देशमुख यांची चौकशी संपल्यानंतर क्लोजर स्टेटमेंट घेण्यात आलं. तिथं काय घडलं हा तपासाचा भाग असल्यानं ते उघड करू शकत नसल्याचं सिंह म्हणाले. संबंधितांना बोलावून समोरासमोर विचारणा केली जाऊ शकते.