VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 August 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची असेल तर कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करू असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्यापूर्वी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असं विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल. रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Latest Videos