VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 May 2022

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 9 May 2022

| Updated on: May 09, 2022 | 11:46 AM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा  यांच्या मागील अडचणींचा सिसेमिरा काही सुटताना दिसत नाहीये. हनुमान चालिसा प्रकरणातून सुटका झाल्यानंतर आता राणा दाम्पत्यांच्या मागे घरातील अनधिकृत बांधकामांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. राणा दाम्पत्यांनी खार येतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेला संशय आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आज राणा यांच्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा  यांच्या मागील अडचणींचा सिसेमिरा काही सुटताना दिसत नाहीये. हनुमान चालिसा प्रकरणातून सुटका झाल्यानंतर आता राणा दाम्पत्यांच्या मागे घरातील अनधिकृत बांधकामांचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. राणा दाम्पत्यांनी खार येतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा पालिकेला संशय आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी आज राणा यांच्या घरी जाऊन पाहणी करणार आहेत. यापूर्वीही पालिकेचे अधिकारी राणा यांच्या घरी गेले होते. या अधिकाऱ्यांनी राणा यांच्या घराची पाहणी करून नोटीस बजावली होती. मात्र, राणा दाम्पत्य तुरुंगात असल्याने पालिका अधिकारी घरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करू शकले नव्हते. आता मात्र, राणा दाम्पत्य घरी आल्याने आज पुन्हा एकदा पालिकेचे अधिकारी त्यांच्या घरी जाणार असून घरातील बेकायदा कामांची पाहणी करून अहवाल तयार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Published on: May 09, 2022 11:46 AM