VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 May 2022

VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 May 2022

| Updated on: May 03, 2022 | 12:55 PM

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भावनिक प्रहार केला. स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री पदावर बसला आहे हे पहावत नसल्याने राज ठाकरे यांचा हा सारा थयथयाट सुरु असल्याची बोचरी टिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे. राज ठाकरे यांची करणमूक करण्याची पद्धत जुनी आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भावनिक प्रहार केला. स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री पदावर बसला आहे हे पहावत नसल्याने राज ठाकरे यांचा हा सारा थयथयाट सुरु असल्याची बोचरी टिका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे. राज ठाकरे यांची करणमूक करण्याची पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला सुपारी घ्यायची ही मनसेची जुनी पद्धत आहे. भोंगा हा विषय देशपातळीवरचा आहे. याबाबत नियंत्रण आणायचे असेल तर केंद्राने कायदा करावा, भोंग्याचा विषय घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला गेलाय, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला. रत्नागिरीमध्ये त्यांनी टीव्ही9 सोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

Published on: May 03, 2022 12:54 PM