VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 30 January 2022
मध्य रेल्वेकडून पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रेल्वेकडून विविध कामांसाठी मेगा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक तब्बल 5 तासांचा असणार आहे.
मध्य रेल्वेकडून पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रेल्वेकडून विविध कामांसाठी मेगा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विद्याविहार अप आणि धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक तब्बल 5 तासांचा असणार आहे. या दरम्यान बेलापूर खारकोपर दरम्यानची सेवा सुरु राहणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. हा मेगाब्लॉक रविवार म्हणजेच आज पाच तासांसाठी सुरु राहील. मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळी 10.55 वाजेपासून दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.
Latest Videos