VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 15 June 2021
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. त्यामागे नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात भाजपने रान पेटवलं असताना नारायण राणे यांना केंद्रात स्थान देत महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन शिवसेनेला जेरीस आणण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलाय.
Latest Videos