TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 31 January 2022
वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर गर्दी करत जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांचेही धाबे दणादणले. हजारोच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. त्यामुळे धारावीत एकच अफरातफर माजली.
धारावीत आज विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर गर्दी करत जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांचेही धाबे दणादणले. हजारोच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. त्यामुळे धारावीत एकच अफरातफर माजली. या आंदोलनामुळे राज्य सरकारही खडबडून जागे झाले आहे. हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकयांच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता आणि हजारो संख्येने जमलेले विद्यार्थी पाहता विद्यार्थी खरोखरच हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर रस्त्यावर उतरले की विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचा घेतलेला हा आढावा.
धारावीत नेमकं काय घडलं?
धारावीत आज दुपारी 3 च्या सुमारास अचानक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अवघ्या अर्ध्या तासात हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराकडे मोर्चा वळवून जोरदार आंदोलन सुरू केलं. यात विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा मोठा समावेश होता. रस्त्यावर अचानक हजारो विद्यार्थी आल्याने या ठिकाणी चक्का जाम झाला होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना पांगवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना न जुमानता आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठिमार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.