ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर जयंत पाटीलांची प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले जयंत पाटील, यासह इतर अपडेटसाठी पहा टॉप 9 न्यूज
ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर यानिकालाने पालिकेवर कुणाचा दबाल होता हे ही स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना आज उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तसेच न्यायालयाने बीएमसीला झटकाही दिला. तसेच उद्या सकाळी 11 पर्यंत लटकेंचा राजीनामा स्विकारा असे आदेश दिला आहे. दरम्यान राजीनामा हातात मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्ला केला आहे. तर प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जावं लागतं. हिम्मत असेल तर मैदानात या असे आवाहन शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी आज दिलं. तर मी लढाईच्या क्षणांचीच वाट बघतोय असेही ते म्हणालेत. सत्याचा नेहमीच विजय होता असे अजित पवार यांनी ऋतुजा लटके यांच्याबाबत आलेल्या निकालावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लटकेंवर पालिकेकडून खोटी केस केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान उद्याची वाट न पाहता आजच त्यांचा राजीनामा स्विकारावा असेही पेडणेकर म्हणाल्या. शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच ठाकरे गटाचा हा रडीचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच राजीनाम्याची प्रक्रीया ही वेळेत सुरू केली असती तर ठाकरेंवर ही वेळ आली नसती असेही म्हस्के यांनी म्हटलं आहे. दरम्यान ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर यानिकालाने पालिकेवर कुणाचा दबाल होता हे ही स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.