Torres scheme fraud : सव्वा लाख मुंबईकरांना गंडा अन् मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणातील मोठी अपडेट समोर
सव्वा लाख मुंबईकरांना गंडा घातल्यानंतर कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. टोरेस कंपनीच्या घोटाळ्याची रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. सव्वालाख लोकांना टोरेसने गंडा घातल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. टोरेस कंपनीच्या संचालकासह, जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सव्वा लाख मुंबईकरांना गंडा घातल्यानंतर कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. टोरेस कंपनीच्या घोटाळ्याची रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात टोरेस कंपनीची स्थापना झाली होती. मुंबईतील दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरारोड या सहा ठिकाणी या कंपनीची शाखा असल्याची माहिती मिळतेय. या सहा शाखांमध्ये सव्वालाख गुंतवणूकदारांनी हजारो कोटी गुंतवल्याचा अंदाज आहे. गुंतवणुकीवर आठवड्याला ६ टक्के व्याज देण्याची कंपनीने बतावणी केली. सोन्यासह अनेक ठिकाणी पैसे गुंतवून व्याज मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. तर गुंतवणुकीनंतर १ लाखांचा मोजानाईटचा हिरा द्यायचे पण तो नकली असल्याचे सांगितलं जातंय. सुरूवातीला गुंतवणुकदारांना नियमित व्याज मिळालं. पण डिसेंबरचं व्याज न मिळाल्याने गुंतवणुकदारांनी चौकशी केली असता शाखांना टाळं अन् कर्मचारीही फरार झाल्याचे पाहायला मिळाले.