Aurangabad मधील करंजखेडा बाजारसमितीत व्यापाऱ्याला मारहाण
शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव का देतो, असं म्हणत एका व्यापाऱ्याला गुंड व्यापाऱ्यांनी बेदम मारहाण (Trader beaten up) केल्याची घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेडा बाजार समितीत (Karanjkheda Market commitee) हा प्रकार घडला.
औरंगाबादः शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव का देतो, असं म्हणत एका व्यापाऱ्याला गुंड व्यापाऱ्यांनी बेदम मारहाण (Trader beaten up) केल्याची घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील करंजखेडा बाजार समितीत (Karanjkheda Market commitee) हा प्रकार घडला. एका व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा माल घेताना त्याला चांगला त्याला चांगला भाव दिला. मात्र यामुळे संतापलेल्या दुसऱ्या व्यापाऱ्याने त्याला जाब विचारला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची बाजू घेणाऱ्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण (Aurangabad fighting) केली. मारहाणीचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. कसाबसा हा वाद शांत करण्यात आला. मात्र बाजारसमिती परिसरात या प्रकारामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली.
Latest Videos