मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव
मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली, त्यात तोटा झाल्यामुळे बायकोला आता काय उत्तर द्यायचे, या विचारातून विरारच्या एका व्यापाराने चक्क दहा लाख रुपयांच्या लुटीचाच बनाव आखला. मात्र त्याचा हा बनाव वसईच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात उघड करत त्याचा पूर्णपणे भांडाफोड केला आहे.
वसई : कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याची लालसा काही क्षणात कशी उद्ध्वस्त करते, याचे एक उदाहरण मुंबईजवळच्या वसई भागात उघड झाले आहे. मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली, त्यात तोटा झाल्यामुळे बायकोला आता काय उत्तर द्यायचे, या विचारातून विरारच्या एका व्यापाराने चक्क दहा लाख रुपयांच्या लुटीचाच बनाव आखला. मात्र त्याचा हा बनाव वसईच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात उघड करत त्याचा पूर्णपणे भांडाफोड केला आहे. पोलिसांनी त्या व्यापाऱ्याचा हा बनाव स्टेशन डायरीमध्ये नोंद केला, तर त्याला समज देऊन सोडून देण्यात आलं आहे.
Published on: Nov 23, 2021 12:24 PM
Latest Videos