VIDEO : Nashik | नाशकात पोलीस आक्रमक, अचानक दुकानं बंद केल्याने व्यापाऱ्यांचा रोष
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा, डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा, डेल्टा प्लस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक प्रशासनाकडून सोमवारपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील मॉल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रेस्टॉरंट दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील, त्यानंतर पार्सल सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नाशिकमध्ये पोलीस आक्रमक झाले असून अचानक दुकानं बंद करत आहेत. अचानक दुकानं बंद केल्याने व्यापारी रोष व्यक्त करत आहेत. अजून एक महत्वाची बाब म्हणजे 4 जुलैपासून विकेंड लग्नसोहळे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
Latest Videos