Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, काय आहे कारण?

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, काय आहे कारण?

| Updated on: May 12, 2023 | 11:07 AM

VIDEO | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्राफिक जाम, 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा, का झाली कोंडी?

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती (Mumbai-Pune Expressway) मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र एक्स्प्रेस वेवर दिसत आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे. मुंबई पुणे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. तर शुक्रवारी पुन्हा मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यातच बोरघाटात सकाळी अपघातही झाला आहे तर पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका विस्कळीत झाली आहे. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात ट्रकचा ब्रेकफेल झाला. यामुळे विचित्र अपघात झालाय. बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. पहाटे चारच्या सुमारास खोपोली परिसरात हा अपघात झाला, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: May 12, 2023 10:32 AM