गुड न्यूज! मुंबई- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार
जिल्ह्यातील पाऊस, खड्डे आणि अवजड वाहतुकीमुळे अनेकदा वाहतुक कोंडी होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे.
ठाणे, 09 ऑगस्ट 2023| जिल्ह्यातील पाऊस, खड्डे आणि अवजड वाहतुकीमुळे अनेकदा वाहतुक कोंडी होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे. या महामार्गावर अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्याचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर होणारी वाहतुक कोंडीमुळे ठाणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोणत्याही अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतुक कोंडी जरी कमी झाली असेल तरी, काही अवजड वाहनांची घुसखोरी अद्याप सुरु आहे.
Published on: Aug 09, 2023 07:58 AM